Advertisement

एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे.

एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला
SHARES

विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय.

विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानानं बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मतं पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतं पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाच्या विरोधात 107 मतं पडली होती.

आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही. या मतांसह एकनाथ शिंदे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आजच्या प्रस्तावाच्या वेळी एमआयएम आणि समाजवादी पक्षाचे तीन आमदार तटस्थ राहिले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली होती.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. आज या गटाला संतोष बांगर हे आमदार देखील येऊन मिळाले. काल संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केले होते. आज बांगर यांनी शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.

30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना आज बहुमत चाचणीला सामोरं जावं लागलं.हेही वाचा

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, एकनाथ शिंदेच शिवसेनेचे गटनेता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीची नोटीस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा