Advertisement

‘शिवसेना भवन’ जवळच शिंदे गटाचे मुख्यालय, जागेची शोधाशोध सुरू

शिंदे गटाने दादर येथील प्रतिष्ठित शिवसेना भवनाला टक्कर देणाऱ्या कार्यालयाचा शोध गेल्या एक महिनाभरापूर्वीच सुरू केला आहे.

‘शिवसेना भवन’ जवळच शिंदे गटाचे मुख्यालय, जागेची शोधाशोध सुरू
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला हादरा देणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता ‘शिवसेना भवन’ शेजारीच पक्षाचे मुख्यालय स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.

शिंदे गटाने दादर येथील प्रतिष्ठित शिवसेना भवनाला टक्कर देणाऱ्या कार्यालयाचा शोध गेल्या एक महिनाभरापूर्वीच सुरू केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यालयापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या कार्यालयाच्या जागेवर हे मुख्यालय बनण्याची चर्चा आहे.

दादरमधील वास्तू सेंट्रल या जागेचे नाव देखील समोर येत होते. इथल्या दोन मजल्यांवर हे कार्यालय उभारण्यात येणार होते. पण चर्चा फिसकटल्याने या जागेचे नाव देखील यादीतून कट झाले आहे. शिंदे कॅम्पने वास्तू सेंट्रलचे दोन मजले विकत घेणार असल्याची चर्चा सुरू होती. पण हा व्यवहार फिसकटला आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदे कँम्पची शोधमोहीम सुरूच आहे.

नवीन कार्यालयाच्या जागेच्या शोधाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिंदे कॅम्पच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, "हे एक सामान्य पक्ष कार्यालय असेल, ज्यामध्ये आमच्या सर्व नेत्यांसाठी आणि आम्हाला सामान्य लोकांना भेटण्यासाठी पुरेशी जागा असेल,"

दादरस्थित शिवसेना भवन हे शिवसैनिकांचे स्फुर्तीस्थान मानले जाते. बाळासाहेबांच्या स्मृतींची साक्ष देणाऱ्या या वास्तूला आवर्जून भेट देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिक येत असतात. आमदार, खासदार आणि पक्षाचे महत्त्वाचे शिलेदार फोडण्यात यश मिळाले असले, तरी शिवसेना भवनाचा ताबा मिळणे कठीण असल्याने, या वास्तूशेजारीच पक्षाचे मुख्यालय स्थापन करावे, असे एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचे मत आहे. त्यामुळे पक्ष कार्यालयासाठी उपयोगात आणता येईल, अशा जागांची चाचपणी गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्यांकडून सुरू आहे.



हेही वाचा

सत्तासंघर्षाची लढाई पुढे ढकलली, 27 सप्टेंबरला पुढील सुनावणी

अमित शहांचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, म्हणाले...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा