Advertisement

शिंदे गटाकडून पक्षासाठी तीन नावांचा पर्याय, 'ही' आहेत नावं

निवडणूक चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने सुचविलेल्या तीनपैकी दोन नावे एकच आहेत.

शिंदे गटाकडून पक्षासाठी तीन नावांचा पर्याय, 'ही' आहेत नावं
SHARES

शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे.

शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय ठाकरे गटाने दिला आहे. तर, शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने 'गदा' या चिन्हाचा तिसरा पर्याय दिला आहे.

तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पर्याय देण्यात आले आहेत. पण शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत.



हेही वाचा

शिंदे गटाचंही चिन्ह ठरलं? तुतारी, गदा आणि तलवारीला प्राधान्य

उद्धव ठाकरेंनी दिला 'या' 3 चिन्हांचा आणि नावांचा पर्याय, पहा कोणती आहेत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा