Advertisement

शिंदे गटाचंही चिन्ह ठरलं? तुतारी, गदा आणि तलवारीला प्राधान्य

निवडणूक आयोगाने शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर बंदी घातली आहे

शिंदे गटाचंही चिन्ह ठरलं? तुतारी, गदा आणि तलवारीला प्राधान्य
SHARES

हिंदुत्ववादी विचारांना पुढे घेऊन जात असल्याचा दावा करणाऱ्या शिंदे गटाने तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हांना प्राधान्य दिल्याची माहिती मिळत आहे. आज शिंदे गट या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगासमोर ठेवणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून सोमवारी एक परिपत्रक जारी करुन निवडणूक चिन्हावर आपली भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत पक्षाच्या कार्यकारिणीने निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपल्या निवडणूक चिन्हासाठी उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच पक्षाच्या नावासाठी तीन पर्याय देण्यात आले असून त्यामध्ये बाळासाहेबांच्या नावाचा समावेश आहे.

शिंदे गटाच्या पक्षाच्या नावातही बाळासाहेब या नावाचा समावेश असावा असा निर्णय झाल्याची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव पुढे घेऊन जाण्याचा मानस शिंदे गटाचा असल्याचं स्पष्ट आहे.

शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सोमवारपर्यंत आपल्या नव्या चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने तीन पर्याय देण्यात आले होते. त्यानंतर आता शिंदे गटाकडूनही त्यासंबंधी हालचाल करण्यात येत आहे.

ज्या तुतारीने रणशिंग फुंकलं जातं त्या तुतारीला शिंदे गटाचं प्राधान्य असल्याचं समजतंय. आज झालेल्या शिंदे गटाच्या बैठकीत आमदार आणि खासदार उपस्थित होते. या सर्वांनी तुतारी या नावाला अग्रक्रम दिल्याचं समजतंय. त्यामुळे येत्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हासह उमेदवार उतरल्यास त्याचं आश्चर्य वाटायला नको.



हेही वाचा

उद्धव ठाकरेंनी दिला 'या' 3 चिन्हांचा आणि नावांचा पर्याय, पहा कोणती आहेत

शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा इतिहास जाणून घ्या, बाळासाहेबांचा 'हा' होता हेतू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा