Advertisement

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ


एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
SHARES

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने नाराज झाले होते, अशी चर्चा आहे. त्यांनी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. 

पण आता केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांची मनधरणी करत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी, असे सांगितले.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.हेही वाचा

उद्धव ठाकरे यांच्या राजिनाम्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले...

"यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…!" भाजपचा शिवसेनेला इशारा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा