Advertisement

एकनाथ शिंदेंचे पद धोक्यात? अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा

अजित पवार यांनी मोठ्या पदाची इच्छा असल्याची आशा देखील व्यक्त करून दाखवली.

एकनाथ शिंदेंचे पद धोक्यात? अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा
SHARES

शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सराकरामध्ये नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत मेळावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी मोठ्या पदाची इच्छा असल्याची आशा देखील व्यक्त करून दाखवली. 

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत आता त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारून पक्षाची धुरा आपल्या हाती द्यावी, अशी स्पष्ट मागणी केली. माझ्या हातात पक्षाची धुरा दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सोनेरी दिवस पुन्हा परत आणू. 2024 साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७१ पेक्षा जास्त जागा निवडून आणू, असा दावा अजित पवार यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसण्याची आपल्या मनातील इच्छाही स्पष्टपणे बोलू दाखवली. अजित पवार यांचे हे आक्रमक पक्षविस्ताराचे धोरण आणि मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा ही शिंदे गटाच्या राजकीय भवितव्याच्यादृष्टीने धोकायदाक ठरु शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिले. मी चार-पाचवेळा उपमुख्यमंत्री झालो. पण गाडी तिथेच थांबते, पुढे काही जात नाही. मलाही असं वाटतं की, मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या असतील तर राज्याचं प्रमुखपद मिळवणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. हे वक्तव्य करुन अजित पवार यांनी आगामी काळातील मुख्यमंत्रीपदावरील आपला दावा स्पष्टपणे सांगितला आहे.

अजित पवार यांची ही महत्त्वाकांक्षा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते. शिंदे गटाचे आमदार पुढील पाच वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असे सांगत आहेत. मात्र, अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा पाहता आगामी काळात ही परिस्थिती कितपत राहील, याबाबत आत्ताच शंका निर्माण झाली आहे.



हेही वाचा

तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

अजित पवारांनी घेतलं पक्षाचं नवं कार्यालय, पहा कुठे आहे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा