राजकीय पक्षांची फलकबाजी सुरूच

 Mumbai
राजकीय पक्षांची फलकबाजी सुरूच
राजकीय पक्षांची फलकबाजी सुरूच
राजकीय पक्षांची फलकबाजी सुरूच
राजकीय पक्षांची फलकबाजी सुरूच
See all

धारावी - महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली, मात्र निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशाचे उल्लंघन चक्क पालिका अधिकारी करीत असल्याचे वास्तव धारावीत उघड झाले आहे. धारावीतल्या संत कक्कया मार्गावर साधारण दीड ते दोन महिन्यांपासून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे फलक झळकत आहेत. आचारसंहिता सुरु होऊन पंधरा दिवस झाले तरी निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी होण्याऐवजी पालिका जी उत्तर विभागाने धारावीतल्या संत कक्कया मार्गावरील फलकबाजीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या फलकाकडे पाहून निवडणूक अधिकारी झोपलेत का? असा प्रश्न धारावीकर उपस्थित करीत असून गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी लावण्यात आलेल्या या राजकीय फलकाकडे पालिकेचे दुर्लक्ष पाहून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

Loading Comments