Advertisement

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आयटी सेलचा वापर? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या कामासाठी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित एका कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आयटी सेलचा वापर? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
SHARES

महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या कामासाठी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित एका कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता साकेत गोखले यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. (election commission hired bjp linked agency for media promotion during maharashtra assembly election alleges rti activist saket gokhale)

निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी साकेत गोखले यांच्या ट्विटची दखल घेत भारतीय निवडणूक आयोगाने याबाबत सविस्तर अहवाल मागवल्याचं कळवलं आहे. सोशल मीडिया प्रमोशनसाठी या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती असा त्यांचा दावा आहे.

साकेत गोखले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून सोशल मीडिया चालवण्यासाठी याआधी भाजपने नियक्त केलेल्या कंपनीची निवड करण्यात आली होती. ही कंपनी भाजप नेत्याच्या मालकीची आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही जुन्या जाहिराती चाळताना एक विलक्षण गोष्ट समोर आली. ती म्हणजे प्रत्येक जाहिरातींमध्ये पत्ता एकसारखा दिसत होता: "२०२ प्रेसमन हाऊस, विलेपार्ले, मुंबई"

हेही वाचा- ‘जय भवानी, जय शिवाजी’! राष्ट्रवादी देणार भाजपला ‘जशास तसं’ उत्तर

पत्ता कोणाचा आहे हे तपासण्याचं मी ठरविलं. साइनपोस्ट इंडिया नावाची ही एक जाहिरात कंपनी होती. फडणवीस भाजपा सरकारच्या काळात ही सरकारची जाहिरात करणारी एजन्सी होती. 

सोशल सेंट्रल या डिजिटल एजन्ससाठीही २०२ प्रेसमन्स हाऊस हा पत्ता वापरण्यात आला. ही एजन्सी देवांग देव यांच्या मालकीची आहे. जे भाजपच्या युथ विंगचे आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत. ते द फिअरलेस इंडियन, आय सपोर्ट मोदी इ. वेबसाईट आणि पेजचे देखील संस्थापक आहेत.

महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित एका व्यक्तीला आणि त्याच्या कंपनीला काम निवडणूक आयोगाने काम देणं ही खरंच धक्कादायक बाब आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचं सोशल मीडिया भाजप संबंधित एका व्यक्तीने हाताळावं तेही स्वतंत्र आणि निष्पक्षपाती या नावाखाली? निवडणूक आयोगाकडून याचं उत्तर अपेक्षित आहे.

असे अनेक प्रश्न उपस्थित करत साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगाकडून याचं उत्तर मागितलं आहे. यावरून राज्याच्या राजकारणात आता आरोप-प्रत्यारोपांना धार येऊ शकते.  

हेही वाचा- तर, ठाकरे सरकारला पाठिंबा, भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा