प्रभाग एक...इच्छुक उमेदवार 35!

 Chembur
प्रभाग एक...इच्छुक उमेदवार 35!

चेंबूर - येथील प्रभाग क्रमांक 152 मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 35 इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारीला लागलेत. पूर्वी महिला वर्गासाठी राखीव असलेला हा प्रभाग आता मागास वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यातल्या कैलास आरवले(काँग्रेस), लहू कांबळे(शिवसेना), आशा मराठे (भाजपा) तर अनिल काशिद(रिपाइं) यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. या प्रभागामध्ये काही प्रमाणात उचभ्रू लोकवस्ती सोडल्यास सिद्धार्थ कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. याच परिसरात 25 ते 30 हजार मतदार असून, हा संपूर्ण परिसर दलित लोकवस्तीचा आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागले आहेत.

Loading Comments