Advertisement

प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी
SHARES

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत.

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी झाल्याची माहिती दिली. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असं रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी ट्विटरवरून एक व्हिडीओ ट्विट करून तीन महिने कार्यरत राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

पक्ष चालला पाहिजे. संघटन चालले पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकांत विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असे आंबेडकर यांनी ट्विटमधून म्हटले होते. 



हेही वाचा -

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा