Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागील सूत्रधार कोण? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे आणि इतरही मंत्री हे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागील सूत्रधार कोण? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
SHARES

एसटी महामंडाळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या मागणीसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी धडक दिली. या आंदोलनमागे कोण आहे? याचा शोध घेणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध मुंबई पोलिस घेणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारा कोणीही मोठा नेता नव्हता. त्यामुळे या आंदोलकांना कोणी भडकवले का? कोणाच्या सांगण्यावरून आंदोलक येथे आले याची चौकशी केली जाणार आहे. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. वळसे पाटील म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी, अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणं क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गानं तसंच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत.

आक्रमक झालेले कर्मचारी निवास्थानाबाहेर आले. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कर्मचाऱ्यांनी थेट 'सिल्व्हर ओक'समोर ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनामध्ये संघर्षही झाला.

यावेळू सुप्रिया सुळे यांनी निवासस्थानाबाहेर येत एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी सुप्रिया सुळेंना घेराव घातला. सुप्रिया सुळेंनी हात जोडून विनंती केली की, माझे आई-वडिल आणि मुलगी आत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवली.

या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे आणि इतरही मंत्री हे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.



हेही वाचा

एसटी कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा