Advertisement

एसटी कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक

एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी केली.

एसटी कर्मचारी आक्रमक, शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी केली.

एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झाला. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्यानं याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

बुधवारी हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देताना सर्व कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर, सरकारनं कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले.

एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असं म्हटलं जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला.

दरम्यान, सरकरवर कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भरकटलेलं असल्याची प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. आज हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी करण्यात आली. कामगारांनी २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावं, असं कोर्टानं सांगितलं आहे.



हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपर्यंत कामावर रुजू होण्याचे हायकोर्टाचे आदेश

मुंबई लोकलमधला लसीकरणाशी संबंधित ‘हा’ नियम हटवला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा