Advertisement

मुंबई लोकलमधला लसीकरणाशी संबंधित ‘हा’ नियम हटवला

मुंबईत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

मुंबई लोकलमधला लसीकरणाशी संबंधित ‘हा’ नियम हटवला
SHARES

मुंबईत (Mumbai) रेल्वेनं (train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेनं लसीकरणाशी संबंधित पर्याय तिकीट अॅपमधून (ticket app) हटवला आहे. गुढीपाडव्याच्या दिवसापासून राज्यातील कोविडसंदर्भातले सर्व निर्बंध हटवण्यात आलेत. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलाय.

कोविडसंदर्भातल्या निर्बंधामुळे केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा होती. मात्र आता राज्य सरकारनं निर्बंध हटवल्यामुळे लस घेतल्याचं प्रमाणपत्र तिकीट अॅपशी लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारनं निर्बंध उठवण्याच्या निर्देशांनुसार, रेल्वेनंही सर्व कोविडसंदर्भातले निर्बंध उठवले आहेत.

मुंबईतल्या रेल्वेसाठी काऊंटरवर आणि अॅपवर सर्वांकरिता तिकिट सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता लशीचे दोन्ही डोस घेतलेल्याच प्रमाणपत्रं तिकिट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही आहे. यासंदर्भातल्या सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या असल्याचं रेल्वेच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे.

तसंच कोविड काळात सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्केलेटर बंद केले होते ते उघडण्यात येतील. याशिवाय फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठी एटीव्हीएम मशीन आता उघडल्या जाणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यानं दिली आहे.



हेही वाचा

मुंबईकरांसाठी खूशखबर, मेट्रो ७ सह २अ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार

मध्य रेल्वे मुंबई-नागपूर दरम्यान २ विशेष गाड्या चालवणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा