Advertisement

प्लास्टिक बाटलीला येणार पर्याय, अभ्यास समिती स्थापन


प्लास्टिक बाटलीला येणार पर्याय, अभ्यास समिती स्थापन
SHARES

प्लास्टिक बाटलीचा पर्याय आणण्यासंदर्भात सरकारने अभ्यास समिती स्थापन केली असून ही समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे, असं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सांगितलं.

मंत्रालयात प्लास्टिकच्या बाटल्यांची निर्मिती आणि त्यांचा पुनर्वापर यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी कदम बोलत होते. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते.


बाटल्या पुन्हा संकलित करा

नियमानुसार प्लास्टिक बाटलीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी विकलेल्या बाटल्या बाजारातून पुन्हा संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रकल्प तयार करावेत, असे आदेशच रामदास कदम यांनी दिले आहेत.


उद्योगांवरील परिणामांवर अभ्यास

शासकीय कार्यालय आणि स्टार हॉटेलमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्यांचा वापर बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील ३ महिन्यांत करण्यात येणार आहे. यासाठी
समिती सदस्य अभ्यास दौरा करून परिपूर्ण अहवाल सादर करणार आहे. या प्लास्टिक बंदीचा उद्योगांवर विपरीत परिणाम होऊ नये आणि पर्यावरणाचा समतोल राखता यावा, याचबरोबर प्लास्टिकला पर्याय आणता येतील का? यासंदर्भात उपाय सुचविण्यात येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.


'असा' करता येईल पुनर्वापर

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर, त्यांचं संकलन उत्पादन कंपन्यांनी करणं आवश्यक आहे. त्याअंतर्गत बाटल्यांचं विभाजन करून, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ करून या बाटल्या पुन्हा वापरासाठी उपलब्ध केल्यास नवीन प्लास्टिक बाटल्यांचं उत्पादन कमी होऊ शकेल, असंही ते म्हणाले.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यासंदर्भात उत्तेजन देणारे उपाय उद्योजकांनी करावेत, त्यासदंर्भातील रिसायकलींग मशिन सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन, जाहिरांतीद्वारे प्रबोधन करावं, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.



हेही वाचा-

शासकीय कार्यालयांत आता प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्यांना बंदी

राज्यातील फटाकेबंदीचा बार फुसका, रामदास कदम यांचा 'यू टर्न'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा