विलेपार्ले - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधील इनकमिंग जोरात सुरु आहे. काँग्रेसचे विलेपार्लेमधील माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रविवारी रात्री कृष्णा हेगडे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्लेत एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी कृष्णा हेगडे यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या कारमधून आशीष शेलार आणि कृष्णा हेगडे एकत्र जात असताना दिसले होते. त्यावेळीच ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.