Advertisement

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन

दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दिक्षीत यांनी रूग्णालयात हजेरी लावली होती.

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन दिक्षीत यांनी रूग्णालयात हजेरी लावली होती.

काही महिन्यांपासून होते आजारी

गेल्या काही महिन्यांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब होती. यामुळेच त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला देखील होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, "मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्री पदासाठी विचार केला जाऊ नये."

कॅन्सरनं त्रस्त

जेटली गेल्या दोन वर्षांपासून कॅन्सरनं लढत होते. कॅन्सर या आजारासोबतच जेटली हे किडनीच्या आजारानं देखील त्रस्त होते. गेल्या वर्षीच त्यांचं किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. 


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा