Advertisement

राहुल गांधींच्या मदतीला पृथ्वीराज बाबा?

राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला विजय मिळवून देण्याचं मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे राहुल यांच्या टीममध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान मिळण्याची शक्‍यता आहे.

राहुल गांधींच्या मदतीला पृथ्वीराज बाबा?
SHARES

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या जाेरात सुरु आहे. विद्यमान उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित आहे. फक्‍त औपचारिकताच तेवढी बाकी असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपाध्यक्षपदी वर्णी लावून त्यांना राहुल यांच्या मदतीला पाठवण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.


म्हणून चव्हाण यांचं नाव आघाडीवर

पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ प्रतिमा असलेले अभ्यासू नेते आहेत. ते गांधी परिवाराशी एकनिष्ठ आहेत. पृथ्वीराज यांच्यासारख्या परिपक्‍व नेत्याची दिल्लीत आवश्‍यकता असल्याचं अनेकांचं मत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पृथ्वीराज यांना मर्यादा आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या राजकारणात पुन्हा बोलावलं जाण्याची शक्यता आहे.


राहुलसमोर मोठं आव्हान

तसेच राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाला विजय मिळवून देण्याचं मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. समोर मोदींसारखं नेतृत्व असल्याने संघटना बांधणी असो की धोरणात्मक निर्णय फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे राहुल यांच्या टीममध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. याबाबत पृथ्वीराज यांच्याकडून दुजोरा मिळालेला नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा