दिंडोशीतील विकास कामांच्या उद् घाटनांचा सपाटा

 Goregaon East
दिंडोशीतील विकास कामांच्या उद् घाटनांचा सपाटा
दिंडोशीतील विकास कामांच्या उद् घाटनांचा सपाटा
See all

दिंडोशी - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 37मध्ये आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते विविध नागरी कामांचा सपाटा  लावण्यात आला. यामध्ये गोरेगाव पूर्वेकडील नागरी निवारा परिषदेतील आरसीसी भिंत बांधणे, इंद्रायणी कृष्णा सोसायटीच्या बाजूची भिंत बांधणे, सातपुडा नागरी निवारा येथे आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक लावणे आणि सुशोभीकरण करणे, श्रीकृष्णनगर येथे नवीन पाइपलाइन टाकणे, शिवशाही प्रकल्प येथील रस्त्यावर दिवे लावणे या विविध कामांचा शुभारंभ या वेळी करण्यात आला.
दरम्यान उपविभागप्रमुख अॅड. सुहास वाडकर, नगरसेविका मनीषा पाटील, माजी नगरसेवक सदाशिव पाटील, शाखाप्रमुख संदीप जाधव, महिला शाखासंघटक वैभवी पाटील, उपशाखाप्रमुख प्रकाश पवार, नारायण भंडारी, सुदाम आव्हाड ,रणजीत भोसले तसेच नारायण पाटील, निलेश लांडगे झिलानी आणि विभागातील विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांशी सतत संपर्कात असून त्यांना विविध सुविधा मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत शिवसेनेला आगामी निवडणुकीत विंजयी करा असे आवाहन करून पालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याचा ठाम विश्वास आमदार सुनील प्रभू यांनी यावेळी व्यक्त केला.

Loading Comments