पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात गुमास्ता पावती

 Goregaon
पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात गुमास्ता पावती
पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात गुमास्ता पावती
पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात गुमास्ता पावती
पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात गुमास्ता पावती
See all

गोरेगाव - पालिकेनं काही वर्षापूर्वी मुंबईत नागरी सुविधा केंद्र सुरु केली होती. मात्र या केंद्रातील मशीन बंद पडल्या असून, त्या ठिकाणी पालिकेचे गुमास्ता विभागातील कर्मचारी गुमास्ता नुतनीकरण करुन देत आहेत. गोरेगाव पूर्व दिंडोशी ऑबेरॉय मॉलच्या बाजूला पलिकेचे नागरी सुविधा केंद्र आहे. या केंद्रात एका कम्प्यूटरवर नागरिकांना जन्म-मृत्यू दाखला, मालमत्ता कर, जल देयक भरणे, अनुञापन प्रमाण पत्र तसेच रस्त्याची माहिती, प्रवासी आपला ईमेल चेक करु शकत होते. या कडे लक्ष ठेवण्यासाठी बाहेर सुरक्षा रक्षक असायचे. प्रवाशांना २०मिनटांचा टाईम सर्च करण्यासाठी आता केंद्राचा कम्पयूटर बंद बद पडला असून, दुरवस्था झालीय. त्यामुळे सध्या या ठिकाणी गुमास्ता नुतनीकरणाचं काम चालू आहे. दरम्यान पालिकाच्या लायसन्स विभागाचे अधिकारी एस.पवार यांनी ही आमची माणसं नसून, कंत्राटदार असतील असं सांगितलं.

Loading Comments