Advertisement

बुधवारी सकाळी १० वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार – नवाब मलिक

आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत.

बुधवारी सकाळी १० वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार – नवाब मलिक
SHARES

आर्यन खान आणि मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी अनेक संशयीतांसह अधिकाऱ्यांच्या चौकशी केली जात आहे. तसंच, नाट्यमय घडामोडी घडत असून, अनेकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आर्यन खानपासून सुरू झालेलं हे प्रकरण आता थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांवर येऊन ठेपलेलं आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय, त्यांनीही आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करण्याचं आव्हान दिलेल्या फडणवीसांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याबद्दलचा खुलासा केला आहे.

फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येत बुधवारी सकाळी १० वाजता फडणवीसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत. त्यांच्या याच आरोपांना नवाब मलिकांनी आता उत्तर दिलं आहे. याविषयी बोलताना आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं.

फडणवीसांनी काही कागदपत्रं लोकांसमोर ठेवली. ज्यात असा उल्लेख आहे की दीड लाख फूट जमीन आम्ही कवडीमोल दराने माफियांच्या मदतीने खरेदी केली. आम्हाला वाटतं की तुम्हाला माहिती पुरवणारे कच्चे खेळाडू आहेत. तुम्ही सांगितलं असतं तर मीच तुम्हाला कागदपत्रं उपलब्ध करुन दिली असती. पण तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरू केलाय. आज तर त्याविषयीच्या सगळ्या गोष्टींबद्दल मी बोलणार नाही. पण बुधवारी सकाळी १० वाजता देवेंद्रजींचा महाराष्ट्रात अंडरवर्ल्डसोबत काय खेळ सुरू आहे आणि देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे पूर्ण शहराला हॉस्टेज बनवलं होतं, त्याविषयी मी माहिती देईन.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटींची जमीन फक्त २० लाखांत खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच, सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली? असे सवाल देखील नवाब मलिक यांना केले आहेत.

मी घोषणा केली होती की काही गोष्टी दिवाळीनंतर तुमच्यासमोर आणेन. थोडा उशीर झाला. कारण कागद गोळा करत होतो, काहींचे पत्रकार परिषदेचे दिवस आधीच बुक होते. मी सांगणार आहे ती सलीम जावेदची स्टोरीही नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही. फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.

सरदार शहावली खान हा १९९३ चा गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागागी झाला. बीएसई आणि महापालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्यानी केली होती. 

टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरलं. साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली.

मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. आर. आर. पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता. पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला, तो हा सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता.

हसीना पारकरला २००७मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावानं संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा. हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता.

मलिक यांच्या कंपनीनं ही जमीन खरेदी केली

कुर्ल्यामध्ये २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटची जागा जिला गोवावाला कंपाऊंड असं म्हटलं जातं. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे.

विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत.

कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट ८५०० आणि मार्केट रेट २०५३ रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन ३० लाखात खरेदी केली गेली. त्यातही १५ लाखांचं पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर १० लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही ५ लाख नंतर मिळतील असं लिहिलं. म्हणजे २० लाखात एलबीएस रोडवर ३ एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला.

२००३मध्ये हा सौदा झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी नवाब मलिक यांना पद सोडावं लागलं. 

  • पण तुम्हाला माहिती नव्हतं की सलीम पटेल कोण आहे? 
  • मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? 
  • मुंबईत बॉम्बब्लास्ट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? 

अशा कोणत्या कारणामुळे त्यांनी एलबीएसमधली ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपीची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का?

या सगळ्या व्यवहारात फार गोंधळ आहे. २००३मध्ये याच मालमत्तेमध्ये ते टेनंट देकील झाले, मग ट्रान्सफर केली, मग पुन्हा खरेदी केली. हा थेट अंडरवर्ल्डशी संबंध दिसतोय. मला या गोष्टीचं दु:ख आहे.

मुंबई बॉम्बब्लास्टच्या दुर्दैवी घटनेची तुम्ही आठवण काढा. हा कट ज्यांनी रचला, रेकी केली, आरडीएक्स भरलं अशा व्यक्तीसोबत तुम्ही व्यवहार करता? अशा एकूण ५ मालमत्ता आहेत, ज्यापैकी चारमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डचा संबंध आहे. २००५पासून २ वर्षांपूर्वीपर्यंतचे हे व्यवहार आहेत. मुंबईच्या खुन्यांशी तुम्ही व्यवहार का केला?

मी ही कागदपत्र संबंधित यंत्रणेकडे देईन. हे सगळे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही मी देणार आहे. त्यांनाही कळेल, की त्यांच्या मंत्र्यांनी काय करून ठेवलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा