Advertisement

'मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरील आक्षेपार्ह पोस्ट थांबवा'


'मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरील आक्षेपार्ह पोस्ट थांबवा'
SHARES

'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल अतिशय विकृत प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असलेल्या या अकाऊंटवरून चालणाऱ्या या प्रकाराला मुख्यमंत्र्यांची संमती आहे का?', असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रकाराला संमती नसेल तर हे अकाऊंट चालवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


फेसबुक अकाऊंटवर कारवाई करणार का?

'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या फेसबुक पेज आणि ट्विटर अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेप घेणारे पोस्ट मोठ्या प्रमाणावर पोस्ट केल्या जात आहेत. 'एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच नावाने चालणाऱ्या पेज आणि अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट होतात, याचा अर्थ काय?' असा प्रश्न उपस्थित करून 'ही खाती चालवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? आणि तो नसेल तर त्यांनी या खात्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी', अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. या अकाऊंटवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे काही परिस्थिती उद्भवल्यास त्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 'रस्त्यावरच्या खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकले म्हणून कारवाई करणारे सायबर सेलचे पोलीस अधिकारी आता झोपा काढत आहेत का?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा