Advertisement

मंत्रालयातील शिक्क्यांच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह


मंत्रालयातील शिक्क्यांच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह
SHARES

नरिमन पॉईंट - मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून एका महाठकाने तरुणाला लाखोंचा गंडा घातल्याचे उघडकीस आले होते. त्यासाठी त्याने समाज कल्याण विभागाच्या शिक्क्यांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्रालयातील शिक्क्यांच्या गोपनियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज समाज कल्याण विभागाच्या सचिवाचा स्टॅम्पचा गैरवापर करण्यात आल आहे. उदया जर गृहविभागाच स्टॅमपचा गैरवापर केल्यास त्याची जबाबदार कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. जर स्टॅम्प बनवणाऱ्या दुकानांमध्ये सहजपणे स्टॅम्प बनत असतील तर हे धोकादायक आहे. त्यामुळे बनावट स्टॅम्पला आळा घालण्यासाठी डिजिटल स्वाक्षरीप्रमाणे शासनाने काही वेगळी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा