गिरणी कामगार करणार वर्षा बंगल्यासमोर उपोषण

  Pali Hill
  गिरणी कामगार करणार वर्षा बंगल्यासमोर उपोषण
  मुंबई  -  

  मुंबई - १८ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर गिरणी कामगार उपोषण करणार आहेत, अशी माहिती गिरणी कामगार संघटनेचे नेते दत्ता इस्वलकर यांनी दिली. सरकार गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय, असा आरोपही त्यांनी केला. गिरण्यांच्या जागेवर कामगारांना घर देण्याची घोषणा आघाडी सरकारने केली होती. त्यानंतर म्हाडाकडे तब्बल दीड लाख कामगारांनी अर्ज दाखल केले. परंतु इतक्या कामगारांना प्रत्यक्षात घर देणं शक्य नसल्याचं एमएमआरडीएने स्पष्ट केलंय. त्यामुळे पनवेलमध्ये बांधलेली १३ हजार तयार घरं देण्याची तयारी तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवली होती. ही तयार घरं ऑगस्टमध्ये वितरित करण्याची घोषणाही सरकारने केली. पण ऑक्टोबर उजाडला, तरी घरवाटपाचा मुहुर्त काही सरकारला सापडत नाहीये. त्यामुळे आता या घरांच्या वितरणाची आठवण करून देण्यासाठी १८ ऑक्टोबरला गिरणी कामगार उपोषण करणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.