Advertisement

लक्षवेधी लावली म्हणून एफडीएच्या अधिकाऱ्याकडून धमक्या- धनंजय मुंडे

अन्न व औषध प्रशासन अधिकारी आर. डी. आकरूपे या अधिकाऱ्याने भाजपा आमदारासह विधान भवनातील कार्यालयात येऊन आपल्याल धमकी दिल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.

लक्षवेधी लावली म्हणून एफडीएच्या अधिकाऱ्याकडून धमक्या- धनंजय मुंडे
SHARES

गुटखाबंदीची लक्षवेधी का उपस्थित केली? असा प्रश्न विचारत अन्न व औषध प्रशासन अधिकारी आर. डी. आकरूपे या अधिकाऱ्याने भाजपा आमदारासह विधान भवनातील कार्यालयात येऊन आपल्याल धमकी दिल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केल्यावर नेत्यांना धमक्या येत असतील, तर हा व्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याचं तत्काळ निलंबन करण्याची मागणी सभागृहातील विरोधकांनी केली.


लक्षवेधीवर उत्तर

मागच्याच आठवड्यात विरोधी पक्षाकडून राज्यातील अवैध गुटखा विक्रीवर लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. त्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी समितीद्वारे अवैध गुटखा प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं स्पष्ट केलं होतं.

मात्र, त्यानंतर ठाण्याचे सहायक अन्न सुरक्षा अधिकारी आर. डी. आकरूपे यांनी उदगीरच्या भाजपा आमदाराला हाताशी धरत आपल्या विशेष अधिकाऱ्या (ओएसडी)ला गाठलं आणि गुटख्याची लक्षवेधी लावल्याचा जाब विचारत धमकवल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. जनतेचे प्रश्न उपस्थित केल्यावर जर माझ्या अधिकाऱ्यांना धमकावलं जात असंल, तर हे अत्यंत क्लेशदायक आहे, असं मुंडे म्हणाले.


निलंबनाचे निर्देश

त्यामुळे या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ त्या अधिकाऱ्यांच निलंबन करावं, अशी मागणी सभागृहात लावून धरण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात जाऊन असं धमकावणं हे लोकशाही व्यवस्थेला धरून नाही. त्यामुळे शासनाने या प्रकाराची दखल घेऊन या अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करावं, असे निर्देश सभापतींनी दिले.


कोण आहे आकरूपे?

आर. डी. आकरूपे हे ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक अन्न सुरक्षा अधिकारी आहेत. याआधीही त्यांच्यावर खूप तक्रारी दाखल आहेत. या सर्व तक्रारींची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन, मुंबईकडून कारवाई देखील करण्यात आली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा