निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या कोलांट्याउड्या

  Mumbai
  निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या कोलांट्याउड्या
  मुंबई  -  

  मुंबई - पालिका निवडणुकीच्या तोंडावर सध्या सर्व पक्षांमध्ये आयाराम-गयारामचे सत्र जोरदार सुरू आहे. अपक्ष नगरसेवक आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी हर्षदा नार्वेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आसिफ भामला, युवासेनेचे स्वप्नील येरूणकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 'कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये कुचंबणा होत होती. तसचे आशिष शेलार यांच्यासोबत मैत्री बऱ्याच वर्षांपासून आहे. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया आसिफ भामला यांनी मुंबई 'लाइव्ह'ला दिली. जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजाने भाजपामध्ये यावे जेणेकरून भाजपा आणि इतर पक्षांमधील फरक समजेल. काही दिवसांपूर्वी आसिफ भामला यांच्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. तेव्हाच आसिफ भामला भाजपात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा वांद्रे पश्चिममध्ये व्यक्त केली जात होती. आमच्या भागातील राहिवाशांची मागणी होती की भाजपा सारख्या प्रोग्रेसिव्ह पक्षासोबत जोडले जावे म्हणून भाजपामध्ये दाखल झाल्याची प्रतिक्रिया मकरंद नार्वेकर यांनी 'मुंबई लाईव्ह'ला दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.