SHARE

दादर - शोषित जनआंदोलन समितीने शनिवारी अत्याचार प्रतिबंधक कायदा बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दादर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या गावस्कर सभागृहात झालेल्या या परिषदेत अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत भूमिका मांडण्यात आली.

या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या जगदीश खैरालिया यांनी जात, धर्म कोणताही असो, आपण माणूस म्हणून जगलो तर समाजात कायदा करा किंवा तो रद्द करा अशी वेळ येणार नाही. असा महत्वपूर्ण सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. यावेळी सुरेश सावंत, दिलीप डाके, मधू धोडी, गणपत मेंगाळ, चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या