Advertisement

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, आता 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

शिवसेना नेते आणि खासदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, आता 'या' प्रकरणी गुन्हा दाखल
SHARES

शिवसेना नेते आणि खासदार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. आता त्यांच्याविरोधात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीनंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत स्वप्ना पाटकर यांच्या लेखी तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 507 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. आवाजाची पुष्टी करण्यासाठी पोलीस ऑडिओ क्लिपची अधिक छाननी करत आहेत.

या 70 सेकंदाच्या ऑडिओ किल्पमध्ये 26 शिव्या देण्यात आल्या आहेत. जी आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात संभाषण आणि शिवीगाळ करत असलेली व्यक्ती संजय राऊत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या जमिनीमधून 1 हजार 34 कोटींचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणात स्वप्ना पाटकर या मुख्य साक्षीदार आहेत. त्यांना साक्ष मागे घेण्यासाठी संजय राऊत धमकावत असल्याची तक्रार पाटकर यांनी केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांना 11 वाजून 38 मिनिटाला अटक करण्यात आल्याचं ईडी सूत्रांनी सांगितलं आहे.

सध्या ईडी कार्यालयाबाहेर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित आहे. काही वेळापूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना बोलून घेतलं होतं. ईडी कार्यालयातून बाहेर येताना ते काही कागदपत्रे आपल्यासोबत घेऊन बाहेर आले. जे राऊत यांना अटक करण्यात आल्याचं मेमो असल्याचं सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार मुंबई ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांचे हस्ताक्षर झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा