वैद्यकीय रुग्णालयाला बाळासाहेबांचं नाव

Andheri, Mumbai  -  

विले पार्ले - महानगरपालिकेचं वैद्यकीय महाविद्यालय कूपर रुग्णालयात लवकरच सुरू होतंय. हे महापालिकेचं उपनगरांतलं पहिलंच वैद्यकीय महाविद्यालय आहे. रुग्णालयाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलं आहे. या महाविद्यालयाचं लोकार्पण आणि नामकरण रविवारी सकाळी 11.30 वाजता झालं. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते या महाविद्यालयाचं उद्घाटन झालं. हे महाविद्यालय कूपर रुग्णालय आणि जोगेश्‍वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयांशी संलग्न असेल. रुग्णालयाचा लोकार्पण समारंभ कूपर रुग्णालयात महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या महाविद्यालयात 150 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. पश्‍चिम उपनगरातील रुग्णांना विशेष वैद्यकीय आणि संदर्भसेवा सुविधा उपलब्ध होणाराय.

या वेळी स्थानिक खासदार गजानन कीर्तीकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्चशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर,  माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, आमदार अमित साटम उपमहापौर अलका केरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहताही उपस्थित होते.

Loading Comments