'टीका करणाऱ्यांनी आधी सावरकर साहित्य वाचावे'

Thane
'टीका करणाऱ्यांनी आधी सावरकर साहित्य वाचावे'
'टीका करणाऱ्यांनी आधी सावरकर साहित्य वाचावे'
See all
मुंबई  -  

सावरकरांची निंदा करणाऱ्यांनी सावरकरांचे साहित्य वाचावे. सावरकर निस्सिम देशभक्त होते. त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांना येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत, अशी घणाघाती टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व हे कुठल्याही उपाध्यांच्या पलिकडचे आहे. म्हणूनच देशवासीयांनी त्यांना 'वीर' ही पदवी दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाण्यात शुक्रवारपासून 29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या साहित्य संमेलनात पहिल्याच दिवशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये उपस्थित होते.  त्यांनी भाषणात सावरकरांची महिमा सांगतानाच काँग्रेसवर देखील जोरदार टीका केली. सावरकर यांचे वैचारिक साहित्यात योगदान आणि त्यांच्या स्वाभिमानी आणि देशभक्तीचे दाखले त्यांनी यावेळी दिले.

ज्याच्या नावापुढे 'वीर' लावले अशा देशभक्ताला इतर पदवीची गरजच नाही. या देशात अनेकांना पद्मभूषण, भारतरत्न या पदव्या मिळाल्या पण नावापुढे "वीर" ही पदवी कुणालाच दिली नसल्याचे सांगत वीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीने देशातील जनता प्रभावित झाल्याचे ते म्हणाले. अंदमान कारागृहात सावरकर ज्योत तेवत होती. ती ज्योत काँग्रेसने विझवली. माझे भाग्य आहे की, ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षा भोगत होते त्याठिकाणी जाण्याचा मला योग आला. काँग्रेसने वीर सावरकरांची विझवलेली ज्योत मी पुन्हा तेवत ठेऊन आलो आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.