Advertisement

शिवस्मारकाला मच्छीमारांचा विरोध


शिवस्मारकाला मच्छीमारांचा विरोध
SHARES

मुंबई - अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या जागेवरून अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने शुक्रवारी विरोध प्रदर्शन केलं. हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतरही सरकार टेंडर काढत असल्याची नाराजी कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी व्यक्त केली. प्रकल्पासाठी लागणाऱ्या हजारो कोटी रुपयांमध्ये टक्केवारी हवी असल्याने भारतीय जनता पार्टी आणि आमदार विनायक मेटे प्रकल्प राबवण्याची घाई करत आहेत. मुळात हरित लवादाकडे दाखल केलेल्या याचिकेतील सुनावणीवर स्मारकासाठी निवडलेल्या जागेवर मासेमारी होत नसल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं. याउलट संबंधित ठिकाणी १५० प्रकारच्या समुद्री जीवांचे वास्तव्य आहे. केवळ ४० प्रजातीचे खेकडे या परिसरात आढळतात, असा दावा दामोदर तांडेल यांनी केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा