बंडखोरांनी बसवले दिग्गजांना घरी

  Mumbai
  बंडखोरांनी बसवले दिग्गजांना घरी
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत केवळ पाचच अपक्ष उमेदवारांचे नशीब फळफळले आहे. परंतु या पाचही अपक्ष नगरसेवकांनी अनपेक्षित विजय मिळवत अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसवले.

  घाटकोपरमधील प्रभाग १२३ मधून शिवसेनेने विद्यमान नगरसेविका डॉ. भारती बावदाने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे विभागप्रमुख सुधीर मोरे यांनी बंडखोरी करत आपल्या वहिनीला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले. हा प्रभाग प्रथमपासून वादात अडकलेला असतानाच दुपारी धक्कादायक निकाल बाहेर पडला. अपक्ष उमेदवार स्नेहल मोरे यांनी अनपेक्षित विजय मिळवताना प्रस्थापित बावदाने यांना पराभवाचे पाणी पाजले. प्रभाग १६० मधून अपक्ष उमेदवार किरण लांडगे यांनी काँग्रेसचे आमदार राजहंस सिंह यांचे पूत्र नितेश आणि विद्यमान नगरसेविका मनाली तुळसकर यांचा पराभव केला. प्रभाग १०२ मधूनही अपक्ष मुमताज खान यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेविका कविता रॉडि्क्स यांचा विजयात अडसर निर्माण करत विजयापासून वंचित ठेवले. आधी काँग्रेसच्या वाटेवर असलेले अपक्ष नगरसेवक चंगेझ मुलतानी यांनी आयत्यावेळी प्रभाग ६२ म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकूनही दाखवली. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक राजू पेडणेकर यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक सदाशिव पाटील यांनाही बंडखोर अपक्षामुळे फटका बसला. अपक्ष उमेदवार तुळशीराम शिंदे यांनी विजय मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार पाडली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.