मुंबई - शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युतीबाबत सुरु असलेली चर्चा मंदावली आहे. मात्र असं असलं तरी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी खबरदारी म्हणून मुंबईतील 227 जागांवर आपल्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. आतापर्यंत भाजपाकडे 227 जागांसाठी 2 हजार 500 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 1 हजार 769 अर्ज प्राथमिक फेरीमध्ये निवडण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार युती झाली नाही तर, या 1 हजार 769 अर्जांमधून जिंकण्याची जास्त शक्यता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांची निवड केली जाणार आहे.