Advertisement

'हिरोईन' शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला, बबनराव लोणीकरांची सारवासारव

हिरोईन शब्दाचा मराठीत नायिका असा होतो आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला, असे मला म्हणायचे होते.

'हिरोईन' शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला, बबनराव लोणीकरांची सारवासारव
SHARES

माजी मंत्री आणि भाजप (BJP) नेते बबनराव लोणीकर(Babanrao Lonikar) यांनी महिला तहसीलदारा(Tahsildar)बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सारवासारव केली आहे. हिरोईन (Actress) शब्दाचा मराठीत नायिका असा होतो आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला, असे मला म्हणायचे होते. तहसीलदारांबद्दल हिरोईन हा शब्द आदराने वापरला. विरोधकांनी हिरोईन शब्दाचे भांडवल करू नये, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः- अखेर 'त्या' जलवाहिनीच्या दुरूस्तीचं काम पुर्ण

शेतकर्‍यांना सरकारने हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र सरकारकडून अद्याप शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळालेले नाही. यासाठी मोर्चा काढण्यासंदर्भात मी बोलत होतो. बोलताना मी तहसीलदार यांचा हिरोईन असा उल्लेख केला, याचा अर्थ वाईट होतो असं होत नाही. हिरोईनचा अर्थ नायिका म्हणजे कर्तबगार महिला असा होतो. विरोधकांना विनंती आहे की हिरोईन शब्दाचा अपमान करु नका. मी हिरोईन हा शब्द चांगल्या अथार्ने वापरला होता आणि तो शब्द वाईटही नाही, असे बबनराव लोणीकर यांनी म्हटले.

हेही वाचाः-फडणवीसांनी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर उधळले

काय म्हणाले बबनराव लोणीकर?

सरकारकडून २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळय़ात मोठा मोर्चा परतूरला करायचा का ? ते तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोक आणेल, ५० हजार लोक आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचे तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटले तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील, असे बबनराव लोणीकरांनी म्हटले.

हेही वाचाः- छ. उदयनराजे भोसले राज्यसभेवर

विरोधकांची टीका
भाजपची संस्कृती रसातळाला गेली आहे. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते, असे राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण (NCP MLA Vidya Chavan) यांनी म्हटले आहे. मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणा आणि मोर्चा मोठा करा, असं लोणीकरांनी म्हटले तेही चुकीचंच आहे. शेतकर्‍यांसाठीच्या मोर्चाचे उद्दीष्ट काय आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मोर्चाला शेतकरी आणा. मात्र भाजपच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत, म्हणून त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जातात. एका महिलेबाबत असं वक्तव्य विनयभंगाचा गुन्हा आहे. महिला अधिकार्‍यांचा सन्मान करणे गरजेचे असून असं वक्तव्य लज्जास्पद आहे, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले. एखाद्या महिलेबद्दल असं वक्तव्य करणे निषेधार्थ आहे. बबनराव लोणीकरांनी याबाबत माफी मागावी. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून लोणीकरांवर काय कारवाई करता येईल, याची माहिती आम्ही घेऊ, असे तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बगळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः-स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र चौथा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा