Advertisement

राणे काढणार नवा पक्ष?


राणे काढणार नवा पक्ष?
SHARES

काँग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणे भाजपामध्ये जातील अशी चर्चा सुरू होती. मात्र दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीनंतर देखील राणेंचा प्रवेश काही निश्चित झालेला नाही. त्यामुळे राणे आता नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दिल्लीतील बैठकीत अमित शाहांबरोबर भाजपा प्रवेशाबद्दल नारायण राणेंची कुठलीच चर्चा झाली नाही. राणे सिंधुदुर्गात उभारत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाबाबत राणेंची ही भेट असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले गेले.

दुसरीकडे राणे भाजपात प्रवेश करणार नाहीत, ते स्वत:चा वेगळा पक्ष काढतील आणि भाजपा आघाडीत सामील होतील, अशी चर्चाही सुरू झाली आहे.


भाजपाच्या एका गटाचा राणेंना विरोध -

भाजपाचा एक गट राणेंना भाजपामध्ये घेण्यासाठी इच्छुक आहे, तर दुसरा गट विरोधात आहे. त्यामुळेच राणेंचा भाजपा प्रवेश अवघड होत चालला आहे.


हेही वाचा - 

नारायण राणेंना शिवसेनेची ऑफर देणारी ती व्यक्ती कोण?

नारायण राणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)
 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा