Advertisement

नारायण राणेंना शिवसेनेची ऑफर देणारी ती व्यक्ती कोण?


नारायण राणेंना शिवसेनेची ऑफर देणारी ती व्यक्ती कोण?
SHARES

काँग्रेसमध्ये नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मला शिवसेनेकडूनही ऑफर होती, पण मी जाणार नाही, अशी मुलाखत एका खासगी वाहिनीला दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राणेंना शिवसेनेची ऑफर देणारी शिवसेनेची ती व्यक्ती कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


काय म्हणाले राणे?

'मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला सांगितले होते, तुम्ही अमुकांना भेटा. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मला शिवसेनेत यायचे नाही.

दरम्यान याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी राणेंना शिवसेनेमध्ये घेण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगितले.


दिवसा पडलेल्या स्वप्नात राणे बडबडत आहेत. शिवसेनेला अशा बेईमान लोकांची गरज नाही. उलट हेच माफिनामा मागून आम्हाला घ्या घ्या असे बोलत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहिले आहेत. इतर हजार लोकांना आम्ही आमच्या पक्षात घेऊ, मात्र राणेंसारख्या बेईमान माणसाला आमच्या पक्षात घेणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. राणेंनी कुठल्या डबक्यात बसलो हे शोधावे. काँग्रेसवाल्यांनी लाथ मारली, भाजपाने दरवाजे बंद केलेत त्यामुळे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती राणेंची झालेली आहे.

- विनायक राऊत, खासदार, शिवसेना


निलेश राणे - विनायक राऊत यांच्यात शाब्दिक प्रहार

या सगळ्यामध्ये माजी खासदार निलेश राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. जोवर विनायक राऊत यांचा पराभव करत नाही. तोवर मी दाडी काढणार नाही, असे निलेश राणे यांनी जाहीर सभेत म्हटले होते. त्यावर विनायक राऊत यांनी मागे दीड लाखांच्या मताधिक्याने निलेश राणे यांचा पराभव केला आता अडीच ते तीन लाखांनी पराभूत करू, असे सांगितले.


विनायक राऊत काय बोलतात याचा कधीच थांगपत्ता नसतो. ते नशेबाज आहेत. नशेत जे तोंडाला येईल तसे ते बोलतात. पुढच्या वेळी त्यांना तिकीट मिळेल की नाही हे त्यांनाच माहीत नाही.

- निलेश राणे, माजी खासदार


हेही वाचा - 

सत्ता गेली म्हणून घरी बसून चालणार नाही - नारायण राणे

नारायण राणे यांच्या संघर्ष यात्रेचं काय होणार?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा