Advertisement

सगळ्यांना सांगूनच पक्ष सोडू - निलेश राणे


SHARES

मुंबई - पक्ष सोडायचा असेल तर सगळ्यांना सांगूनच सोडू, असा बंद खोलीत बसून सोडणार नाही अशी रोखठोक प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे. तसेच 'अद्याप तरी आम्ही कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. कार्यकर्त्यांना सांभाळायचं काम प्रदेशाध्यक्षांचं असतं. मात्र तसं होताना दिसत नाही, त्यामुळे मी हा राजीनामा दिला' असं सांगत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच केबिनमध्ये बसून निवडणुका जिंकता येत नाहीत असा टोलाही त्यांनी यावेळी प्रदेशाध्यक्षांना लगावला. 'मी गेली दोन वर्ष सांगतोय रत्नागिरी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष बदला, पण तसं काही झालं नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या मनातही संभ्रम आणि भीती निर्माण झालीय. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला असंही त्यांनी बोलताना सांगितलं.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी सकाळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना दिल्यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती. मात्र निलेश राणे यांनी सध्या तरी मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करेन असं सांगत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा