Advertisement

विषय एक, पत्रकार परिषदा दोन, शिवसेना मंत्र्यांचं चाललंय काय?


विषय एक, पत्रकार परिषदा दोन, शिवसेना मंत्र्यांचं चाललंय काय?
SHARES

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सारी ताकद पणाला लावेल, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात. पण शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये याप्रश्नी कुठलाही समन्वय नसल्याचं त्यांच्या वर्तनावरून सध्या तरी दिसून येत आहे. शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटलं. या भेटीनंतर शिवसेना मंत्र्यामध्ये दोन गट झाल्याचं पाहायला मिळालं.

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आपापल्या दालनात एकाच विषयावर दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेतल्या. एवढंच नव्हे, तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी देखील मंत्रालयाबाहेर पत्रकारांना या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली. त्यामुळं शिवसेना मंत्री आणि नेत्यांमध्ये चाललंय काय? असा प्रश्न सर्वांनीच उपस्थित केला.



जिथे कमी तिथे आम्ही 

शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर रामदास कदम यांना विचारले असता आम्ही सत्तेत असलो, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांची भूमिका बजावत आहोत. जिथे कमी तिथे आम्ही, असे कदम म्हणाले.
तर, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या हातात पडेल, असे आश्वासन आमच्या शिष्टमंडळाला दिल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.


मागील ६ महिन्यांपासून सरकार कर्जमाफीची घोषणा करत आहे. प्रत्यक्षात पदरात काहीच पडलेलं नाही. आज देखील शेतकरी आत्महत्या करत आहेत. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. मात्र दसऱ्यापर्यंत कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो.
- रामदास कदम, पर्यावरण मंत्री


खरिपाचा हंगाम गेला. त्यामुळं रब्बीच्या हंगामाला शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावं, असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं. दसऱ्यापर्यंत सर्व शेतकरी कर्जातून मुक्त झाले पाहिजेत, अशी आम्ही भूमिका मांडली.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री



हे देखील वाचा -

कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा