कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?

Mumbai
कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?
कर्जमाफी झालेले मुंबईतले 813 शेतकरी कोण?
See all
मुंबई  -  

राज्य सरकाराने शेतकरी कर्जमाफी नुकतीच जाहीर करून शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केले. विशेष म्हणजे मेट्रोसिटी म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख या आकडेवारीत आहे. त्यामुळे मुंबईतील कर्जमाफी झालेले ते 813 शेतकरी कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्य मुंबईकरांना पडला आहे. मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करत असून, राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने'अंतर्गत मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. यामध्ये मुंबई शहरातील 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगरातील 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.
असे आहेत मुंबईतील कर्जमाफी झालेले शेतकरी –
मुंबई शहर – 694
मुंबई उपनगर – 119


मुंबईत शेतकरी आहेत तरी कुठे?

मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हानिहाय कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी ट्विटरवरुन जाहीर केल्यानंतर, लोकांनीही या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शेती करतात त्यांना कर्जमाफी का? असे सवाल उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस –
मुंबईत शेतकरी आहेत का? हा मलाही पडलेला प्रश्न असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जाहीर केलेले यादी ही प्रस्तापित लाभार्थ्यांचीही असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा

शेतकरी कर्जमाफीवरून श्रेयवादाचा अंक सुरू

शेती करणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कर्जमाफी द्या - भाई जगतापडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.