सत्ता गेली म्हणून घरी बसून चालणार नाही - नारायण राणे

  Mumbai
  सत्ता गेली म्हणून घरी बसून चालणार नाही - नारायण राणे
  मुंबई  -  

  सत्ता गेली तरी घरी बसून चालणार नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श घ्यायला हवा, असा घरचा आहेर काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

  विधान परिषदेत दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या गौरव कार्याच्या प्रस्तावावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, इंदिरा गांधी यांचे खंबीर नेतृत्व देश कधीही विसरू शकणार नाही.

  १९७७ मध्ये काँगेसचा पराभव झाला, त्यावेळी इंदिरा गांधी यांना नागपूर येथे पत्रकारांनी प्रश्न विचारला की काँग्रेस पक्ष एवढा मोठा पक्ष असताना पराभव कसा झाला ? त्यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होती की हार झाली म्हणून काय झाले, मी घरी बसून राहणार नाही. कारण मी पुन्हा जिंकणार आहे. इंदिरा गांधी यांनी त्याकाळी दिलेले उत्तर आता काँग्रेस नेत्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे, असा घरचा आहेर राणे यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३२० व्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी रायगडावर आल्या होत्या. त्यावेळी योगायोगाने तेथे इंदिरा गांधींना जवळून पाहण्याचा योग आला होता. त्यावेळी त्यांनी महाराजासमोर उभे राहून ज्या तऱ्हेने वंदन केले त्यातून त्यांच्या करारी व्यक्तीमत्वाची झलक दिसली, असे राणे यांनी सांगितले.

  देशातील कोणताही मोठा नेता हा त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे पक्ष आणि धर्मापलिकडचा असतो. पण इंदिरा गांधी यांच्या गौरव प्रस्तावावर चर्चा होत असताना सभागृहात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील सदस्यही म्हणावे तेवढ्या संख्येने उपस्थित नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.  हे देखील वाचा - 

  तावडेंच्या मदतीला धावले राणे,  तटकरे

  'हा नारायण राणे बाळासाहेबांनी या राज्याला दिला'


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.