सुषमा स्वराज यांचं निधन

वयाच्या ६७व्या वर्षी सुषमा स्वराज यांनी घेतला अखेरचा श्वास.

SHARE

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं वयाच्या ६७ व्या वर्षी दु:खद निधन झालं आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना तातडीनं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. मात्र, रात्री ११ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एम्समध्ये दाखल झाले. 

तीन तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. त्यांनी ट्वीट करत सरकारचं अभिनंदन केलं. ”पंतप्रधान मोदीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहाण्याच्या प्रतिक्षेत होती”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.


संबंधित विषय
ताज्या बातम्या