Advertisement

मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे निधन


मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे निधन
SHARES

विलेपार्ले - माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार रमेश प्रभू यांचे 11डिसेंबर रोजी सकाळी ६:३०च्या सुमारास निधन झाले. प्रदीर्घ आजाराने प्रभू निवास या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील पाच महिन्यांपासून रमेश प्रभू आजारी असल्याची माहिती माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी दिली. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना अलिकडेच घरी आणण्यात आले होते. मात्र शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते. राजकारणात असले तरी रमेश प्रभू यांचं समाजकार्यही मोठं होतं. शिवसेनेत असताना १९७८ साली रमेश प्रभू मुंबईचे महापौर म्हणुन निवडले गेले होते.
काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त, राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंनी रमेश प्रभू यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी संध्याकाळी अंधेरीच्या पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा