गणेशोत्सव २०१९: गणेशोत्सवात आचारसंहिता नको, समन्वय समितीची मागणी

ऐन गणेशोत्सवादरम्यान किंवा अगोदर आचारसंहिता लागल्यास गणेश मंडळांना राजकीय नेत्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावं लागणार आहे.

SHARE

गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहिले असून, मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाच्या तयारीला जोरदार सुरूवात झाली आहे. सर्व गणेश मंडळांमध्ये आनंदाच वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणावर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं विर्जण पडण्याची शक्यता आहे. कारण, गणेशोत्सवानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ऐन गणेशोत्सवादरम्यान किंवा अगोदर आचारसंहिता लागल्यास गणेश मंडळांना राजकीय नेत्यांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित राहावं लागणार आहे.


गणेशोत्सवावर बंधनं

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं गणेशोत्सवावर बंधनं येण्याची शक्यता आहे. तसंच, महत्वाचं म्हणजे गणेशोत्सवाचं आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता जास्त अाहे. त्यामुळं यंदाच्या गणेशोत्सवाला आचारसंहितेतून सूट मिळावी आणि विधानसभा निवडणूक थोडी पुढे ढकलावी यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं  निवडणूक आयुक्तांना निवेदन दिलं आहे, असं समितेचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितलं.

मंडळांना मदत

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थानिक रहिवाशांकडून मिळणारी वर्गणी आणि राजकीय नेत्यांकडून मिळणाऱ्या जाहिरातीच्या पैशांतून गणेशोत्सव साजरा करतात. यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता गणेशोत्सवादरम्यान लागू होण्याची शक्यता असल्यामुळं नेत्यांकडून मंडळांना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

राजकीय जाहीरातींची मोठी गरज

दरम्यान, याबाबत मुंबई लाइव्हनं मुंबईतील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांसोबत बातचित केली. त्यावेळी त्यांनी सुद्धा समितीच्या मागणीला दुजोरा देत. विधानसभा निवडणुका पुढे ढकल्याची मागणी केली. त्याशिवाय, मुंबईत अशी बरीच छोटी-मोठी गणेश मंडळ आहेत, ज्यांना राजकीय जाहीरातींची मोठी गरज असते. त्यामुळं अशा मंडळांचा विचार करत विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी या मंडळांनी केली.हेही वाचा -

गणेशगल्लीत यंदा पाहायला मिळणार राम मंदिराची प्रतिकृती

पुरामळं बेघर झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावली गणेश मंडळंसंबंधित विषय
ताज्या बातम्या