Advertisement

शिवस्मारक होणारच - मुख्यमंत्री


शिवस्मारक होणारच - मुख्यमंत्री
SHARES

मुंबई - महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हे भुमिपूजन होतंय. त्यासाठी सरकारकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. याचाच प्रत्यय आला शुक्रवारी शोभायात्रेदरम्यान. गेट वे ऑफ इंडियावर तर लोकसंगीत आणि लोकनृत्याच्या कार्यक्रमानं अवघं वातावरण शिवमय झाल्याचं पाहायला मिळालयं. कुणीही कितीही विरोध केला तरी शिवस्मारक होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाला विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. भाजापानं केलेल्या या थाटामाटाचा विरोधकांनी समाचार घेतला, मात्र विरोधक करत असलेले आरोप चुकीचे असल्याचं सांगत शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. मुंबई महानगरपालिका निवडणूक घोषित होण्यापूर्वीचं भाजपानं साधलेलं टायमिंग, त्यात शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाची रणणीती याचा फायदा पालिका निवडणुकीत भाजपाला होतोय का हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा