Advertisement

प्रभाग समिती अध्यक्षपदी गीता गवळी


प्रभाग समिती अध्यक्षपदी गीता गवळी
SHARES

भायखळा - ई वॉर्डच्या कार्यालयात प्रभाग ए, बी आणि ई प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. त्यात अखिल भारतीय सेनेच्या प्रभाग क्रमांक 212 च्या नगरसेविका गीता गवळी यांचा विजय झाला आहे. त्यांच्या विरुद्ध प्रभाग क्रमांक 213 चे नगरसेवक जावेद जुनेजा उभे होते. या निवडणुकीत गीता गवळी यांना सात मतं पडली, तर जावेद जुनेजा यांना पाच मतं पडली. 

या आधी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जावेद जुनेजा होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत जुनेजा यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला. या आधी गीता गवळी यांनी मुंबई आरोग्य समिती सदस्यपद भुषवले होते. त्यासोबतच त्या स्थायी समितीच्या सदस्या देखील होत्या. तसेच गीता गवळी या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement