Advertisement

मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंचं नाव द्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला (Mumbai goa national highway) स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे (kanhoji angre) यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी भाजप खासदार संभाजीराजे भोसले (bjp mp chatrapati sambhaji raje) यांनी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रेंचं नाव द्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
SHARES

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला (Mumbai goa national highway) स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे (kanhoji angre) यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी भाजप खासदार संभाजीराजे भोसले (bjp mp chatrapati sambhaji raje) यांनी केली आहे. संभाजी राजे यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (transport minister nitin gadkari) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

संभाजी राजे (bjp mp chatrapati sambhaji raje) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे पत्र ट्विट केलं आहे. या पत्रात ते लिहिलात की, छत्रपती शिवाजी महाराजांनी (chatrapati shivaji maharaj) दूरदृष्टी ठेवून एका सुसज्ज आरमाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक म्हटलं जातं. महाराजांनी त्या काळात आरमाराचे महत्त्व ओळखून स्थापना केली, जेव्हा समकालीन मुघलांनी किंवा इतर राजांनी विचारही केला नसेल.  

महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब (aurangajeb) स्वराज्यावर चालून आला होता. यवनांच्या तावडीतून स्वराज्याचं रक्षण करण्याकरता अगणित मावळ्यांनी आपलं योगदान दिलं आपली प्राणाहूती दिली. त्यामध्ये स्वराज्याच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही. कान्होजी आंग्रेंनी औरंगजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे, तर पुढे १७२९ पर्यंत मराठा साम्राज्याची अहर्निश सेवा करून इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या शत्रूंवरही दहशत बसवली. याचे शेकडो पुरावे इंग्रज व पोर्तुगीजांच्या दप्तरात मिळतात. ते पाहिल्यानंतर कान्होजी आंग्रे यांच्याएवढा पराक्रमी आरमारी सेनानी अखिल हिंदुस्थानच्या इतिहासात झाला नाही, याची मनोमन साक्ष पटते. कोकणच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या तसंच हिंदुस्थानच्या आरमारी इतिहासाची पूर्तता कान्होजी आंग्रेंशिवाय होऊ शकत नाही.

अशा या स्वराज्यनिष्ठ महान वीराची दखल घेऊन मुंबई-गोवा महामार्गाला सरखेल कान्होजी आंग्रे (kanhoji angre) यांचं नाव देण्यात यावं अशी महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शिवभक्त तसंच इतिहासप्रेमींची मागणी असल्याचं संभाजीराजेंनी (sambhaji raje) आपल्या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा