Advertisement

...तरी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेन - मनोहर पर्रीकर

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत लिलावती रूग्णालयात उपचार घेणारे गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारांसाठी वेळ द्यावा लागणार असला, तरी गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या जबाबदाऱ्या मी पार पाडेन अशा आशयाचं पत्रक जारी केलं आहे.

...तरी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडेन - मनोहर पर्रीकर
SHARES

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईत लिलावती रूग्णालयात उपचार घेणारे गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उपचारांसाठी वेळ द्यावा लागणार असला, तरी 'गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या जबाबदाऱ्या मी पार पाडेन' अशा आशयाचं पत्रक जारी केलं आहे.


 

मनोहर पर्रीकरांना नक्की काय झालंय?

१५ फेब्रुवारी रोजी मनोहर पर्रीकरांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गोवा मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात अन्नातून झालेल्या विषबाधेच्या तक्रारीसाठी ते उपचार घेत होते. मात्र, तिथे निदान न झाल्यामुळे त्यांना लिलावतीमध्ये दाखल करण्यात आलं. लिलावतीमधील कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. पी. जगन्नाथ यांच्या देखरेखीखाली मनोहर पर्रीकर यांच्यावर उपाचार सुरू होते.

उपचारांदरम्यान, मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, असं काहीही नसल्याचं सांगत रूग्णालय प्रशासनानं हे वृत्त फेटाळून लावलं. तसेच, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचं सांगत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही रूग्णालयाकडून सांगण्यात आलं.


लिलावती ते गोवा विधानसभा

दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मनोहर पर्रीकरांना लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. लागलीच मनोहर पर्रीकर गोव्यामध्ये दाखल झाले. २२ फेब्रुवारी म्हणजेच गुरूवारी सकाळी त्यांनी गोवा विधानसभेमध्ये राज्याचा अर्थसंकल्पही सादर केला. त्यानंतर लगेचच मनोहर पर्रीकरांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर संबंधित पत्रक जारी केलं.





उपचार सुरु, मात्र जबाबदाऱ्या पार पाडणार

या पत्रकामध्ये मनोहर पर्रीकरांनी गोवेकरांचे, तसेच त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. त्यासोबतच आपण गोवा मुख्यमंत्रीपदाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणार असल्याचं त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे. 'आजारपणावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यायला सांगितलं आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या या उपचारामुळे माझा दैनंदिन कारभारातील सहभाग मर्यादित असेल. मात्र, तरीही गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्या पार पाडणार', असं त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे.


आता पुढे काय होणार?

दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचार कुठे घेणार? ते पुन्हा मुंबईत लिलावतीमध्ये दाखल होणार का? याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा