Advertisement

गोव्याच्या ऊर्जामंत्र्यांना ब्रेन स्ट्रोक, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल


गोव्याच्या ऊर्जामंत्र्यांना  ब्रेन स्ट्रोक, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
SHARES

गोव्याचे ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती गोव्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी मंगळवारी दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सध्या स्वादूपिंडाच्या कर्करोगावर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांच्यापाठोपाठ मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे.


नेमकं काय घडलं ?

मंगळवारी सकाळी मडकईकर यांना हॄदयविकारचा झटका आल्याचं समजून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु वैद्यकीय चाचणीत त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचं पुढं आलं.


ब्रेन स्ट्रोकची शस्त्रक्रिया

खूपच अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारपासून उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले होते. परंतु मंगळवारी त्यांची परिस्थिती खूपच खालावत गेल्याने त्यांना तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती विश्वजीत राणे यांनी दिली.हेही वाचा-

नाणारची अधिसूचना रद्द करा, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा