शिवसेना तुमच्या छाताड्यावर भगवा रोवेल - उद्धव ठाकरे

 BKC
शिवसेना तुमच्या छाताड्यावर भगवा रोवेल - उद्धव ठाकरे
BKC, Mumbai  -  

 

वांद्रे - बीकेसीच्या 'एमएमआरडीए'च्या मैदानात शिवसेनेच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी तुमच्या सात नाही सातशे पिढ्या उतरल्या तरी माझी शिवसेना तुमच्या छाताड्यावर भगवा रोवेल, असा इशारा भाजपाला दिला. या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच पीएम तुमचा सीएम तुमचा, महापौर तुमचा, मग आम्ही काय तुमचे कपडे धुवायचे? मागे पृथ्वीराज चव्हाण बोलले होते निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाण दिसत नाहीत. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी आपली औकात काढली. 23 तारखेला औकात दिसेल. असं सांगत त्यांना थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

         बीकेसीच्या सभेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

 • एकदा विजयाचा निश्चय केला की विजय होतोच
 • प्रचार जवळजवळ संपलाय कारण समोरून बोलण्यासारखे कुणी नाही
 • पुण्यात मुख्यमंत्र्यांची पारदर्शक सभा झाली कारण सभेला कुणीच नव्हतं
 • पुण्यात व्यंकय्या नायडू म्हणाले मुळा मुठा नद्यांचं नाव बदला. मुळा नाहीतर काय गाजर ठेवायचं?
 • बदलायचं असेल तर औरंगाबादचं नाव बदला.
 • आमची लेना बँक नाही. जे काही आहे ते समोर आहे. त्यांची नो अॅक्सिस बँक

  इतका फेल मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदा लाभलाय

 • मुंबईकरांसाठी आरोग्य कवच योजना मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासून सुरू करणार
 • मुंबईत रस्ते विकास, नालेसफाई केली. आरोग्य सुविधा, व्हर्चुअल क्लासरूम, विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी टॅब आम्ही पुरवले
 • भाजपाच्या जाहिरातींचा दर्जा खालावला आहे.
 • सीसीटीव्ही लावून मुंबई सुरक्षित राहणार हा भाजपाचा दावा चुकीचा
 • कालपरवा भिवंडीत काय झाले? (मनोज म्हात्रे यांचा खुन)

  मुख्यमंत्र्यांना ते दिसत नाही कारण त्यांचा वायफाय बंद आहे

  भाजपाने गुंडापुंडांना प्रवेश द्यायला सुरूवात केली आहे

  मुंबईला शिवसेनाच सुरक्षित ठेऊ शकते

 • मनोज म्हात्रे यांचा खून भाजपाच्या उपाध्यक्षाने केला आहे. खुनी अजूनही फरार आहेत

  सीसीटीव्हीत पुरावे आहेत. आरोपींना पकडून दाखवा. फाशी देऊ नका त्यांनी जसा खून केला तसेच त्यांना ठेचून मारा

 • मुंबईत जलबोगदे आम्ही केले. तुम्हाला ते कधीही दिसले नाहीत. मी जाऊन त्यांचे काम पाहिले. तुमच्या हातावर रेष उमटली म्हणून तुम्ही मुख्यमंत्री
 • आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी तुमचं मंत्रिमंडळ किती बरबटलेलं आहे ते बघा आधी.
 • महाराष्ट्रात पहिल्यांदा असा फेल मुख्यमंत्री भेटला
 • तुम्हाला नावच बदलायचं असेल तर औरंगाबादचं संभाजीनगर करा

संपूर्ण सभा पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  https://www.facebook.com/Shivsena/videos/10154054444982030/

Loading Comments