शिवसेनेचे मंत्री आज देणार राजीनामा?

 BKC
शिवसेनेचे मंत्री आज देणार राजीनामा?
शिवसेनेचे मंत्री आज देणार राजीनामा?
शिवसेनेचे मंत्री आज देणार राजीनामा?
शिवसेनेचे मंत्री आज देणार राजीनामा?
See all

मुंबई - महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये शिवसेनेची सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेने युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना शनिवारी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

राज्य सरकार नोटीसवर आहे असेही वारंवार शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले गेले. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी अगोदरच सांगितले आहे की, त्यांचे राजीनामे तयार आहेत, बॅगा तयार आहेत. फक्त आदेशाची वाट बघत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे मंत्री आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे पुढील निर्णय घेतील असंही सूत्रांनी सांगितलं. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेना-भाजपाने युती न करता निवडणूक लढवली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्याकडे गृहखाते असल्याने शिवसैनिकांच्या विरोधात दडपशाहीचा वापर केला जात आहे त्याकारणाने एकनाथ शिंदे यांनी सभेत मंत्रीपदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. तसाच प्रकार मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलामध्ये शिवसेनेच्या सभेमध्ये होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे सर्व मंत्री आपले राजीनामे उद्धव ठाकरेंकडे सोपवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Loading Comments