Advertisement

मराठ्यांच्या रोषाला सरकारच जबाबदार


मराठ्यांच्या रोषाला सरकारच जबाबदार
SHARES

सीएसटी- "मराठा समाजाचे मोर्चे हे समाजातील प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात नाहीत. तर गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांवर राज्य सरकारने तातडीने तोडगा काढावा", अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी केली.
"राज्यभरात मराठा समाजाचे मार्चे निघत आहेत. यात मराठा समाजातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी हे स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. या मोर्चांना कोणत्याही राजकीय पक्षाची फूस नाही, मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर सरकारने मार्ग काढण्याचे प्रयत्न न केल्याने मराठा समाजात नाराजी निर्माण झाली आहे", असे अशोक चव्हाण म्हणाले. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते
"मुख्यमंत्री हा प्रस्थापित नेत्यांविरोधातील विस्थापितांचा आक्रोश असल्याचे सांगत आहेत. येथे प्रस्थापित आणि विस्थापित याचा काहीही सबंध नाही. मुख्यमंत्री हे सत्तेवर असल्याने प्रस्तापित झाले आहेत. आता त्यांच्यांवर मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आली आहे", असा टोलाही त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पदावरून दूर करण्यासाठी राज्यात अस्वस्थता निर्माण केली जात असल्याचा केलेला आरोप हा चुकीचा असल्याचे यावेळी अशोक चव्हाण म्हणाले. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement